नागपूर : महा मट्रो नागपूर मॅराथॉन निमित्त नागपुरात आलेल्या प्रसिद्ध कुस्तीपट्टू सुशील कुमार सोलंकी आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या ‘२६/११’ या दहशतवादी हल्यात शौर्य गाजवणारे प्रवीण कुमार यांनी रविवारी मेट्रो हाऊस येथे सदिच्छा भेट दिली.
महा मेट्रोचे संचालक (वित्त) एस शिवमाथन आणि महा व्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी शहरात निर्माणाधीन महा मेट्रो नागपूर प्रकल्पाने गेल्या तीन वर्षाच्या अल्प कालावधीत कशा प्रकारे प्रगती केली याची सुशील कुमार आणि प्रवीण कुमार यांना संपूर्ण माहिती दिली. सुशील कुमार आणि प्रवीण कुमार यांनी मेट्रो प्रकल्पात आतापर्यंत झालेल्या कार्याची प्रशंसा केली.
सुशील कुमार आणि प्रविण कुमार यांच्या भेटी दरम्यान मेट्रो हाऊस येथे आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. खेळाप्रती आपला देश प्रगती करत असून हरियाणासह महाराष्ट्र देखील चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्यास्तीत ज्यास्त तरुणांनी क्रीडा क्षेत्रात शामिल व्हावे असे आवाहन त्यांनी मेट्रो हाऊस येथून समस्त नागरिकांना केले. दरम्यान सुशील कुमार आणि प्रवीण कुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सोबत स्लेफी काढून घेतली. महा मेट्रोच्या सौजन्याने आयोजित ‘महा मट्रो नागपूर मॅराथॉन २०१८’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोच्या संख्येने लहान मुलांनी, तरुण आणि महिलांवर्ग या मॅराथॉन २०१८ मध्ये सहभागी झाले होते. यावेळी महा मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मॅराथॉन स्पर्धेत भाग घेतला.
अधिक वाचा : मनपामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा