क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनावेळी गोंधळ, धोनी कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून निघाला

Date:

नागपुर : नागपुरात एका कार्यक्रमातील गोंधळ आणि ढिसाळ आयोजनमुळे हिंदुस्थानचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाराज झाला. नाराज धोनीने कार्यक्रम अर्ध्यावरच सोडून थेट हॉटेल गाठले. नागपुरात एसजीआर क्रिकेट अकादमीमार्फत नागपूरच्या गायकवाड-पाटील इंटरनॅशनल शाळेच्या आवारात महेंद्रसिंह धोनी रेसिडेंशीअल क्रिकेट अॅकॅडेमीच्या उद्घाटनाच्यावेळी हा गोंधळ उडाला.

चाहत्यांच्या मोठ्या गर्दीमुळे धोनीला कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला पाठीमागून गवत आणि काटेरी झुडूपांमधून वाट काढत आणावे लागले. त्यानंतर स्टेज जवळ प्रसारमाध्यमे आणि हौशी चाहत्यांनी धोनीचे मोबाईलवर फोटो काढण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे धोनीच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांनी लोकांसोबत धक्काबुक्की केल्याने तेथे गोंधळ निर्माण झाला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमानंतर धोनी रेसीडेंशीअल अकादमीच्या खेळाडूंसोबत मुख्य कार्यक्रमासाठी मैदानावर जाणार होता. मात्र ढिसाळ नियोजनामुळे त्याने मैदानावर जाण्याचे टाळून थेट हॉटेल गाठले.

Read Also : MS Dhoni Cricket Academy launched at Gaikwad-Patil International School in Nagpur

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related