चिकन- कोणताही मांसाहार पदार्थ शक्यतो दुसऱ्यांदा गरम करून खाऊ नये. त्यातही चिकन हे पचायला जड असतं. ते दुसऱ्यांदा गरम करून खाल्यावर पचनक्रियेचे आजार होऊ शकता.
बटाटा- बटाटा गरम करून खाल्यावर पचनयंत्रणा बिघडते.
पालक- पुन्हा एकदा पालक उकडल्यावर त्यातील नाइट्रेटचे प्रमाण कमी होते. तसेच कर्करोगाचं प्रमाण वाढतं.
मशरूम- मशरूमला पुन्हा एकदा गरम केल्यावर त्यातील प्रोटीनचे कंपोझिशन बदलून जाते.
बीट- बीट उकडून खाल्यावर त्यातील नाइट्रेट संपून जातं.
शक्यतो ताजं बनवलेलं जेवण गरम असतानाच जेवावं. जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा ते गरम करावं लागणार नाही.