नागपूर : उपराजधानीतील दंतरोग तज्ज्ञ डॉ. रिचा मेहता (झरारिया) यांनी जयपूरला झालेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स- २०१८ या स्पर्धेत विजेतेपद पटकावले असल्याची माहिती डॉ. रिचाचे पती व मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे स हयोगी प्राध्यापक डॉ. आशीष झरारिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कंठा प्रॉडक्शनच्या वतीने जयपूरच्या अथर्व पॅलेस येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी नागपूर, लखनऊ, जयपूर, लुधीयाना, बेंगळूरू, दिल्ली येथे निवड प्रक्रिया झाली. त्यात प्रत्येक स्पर्धकाला ओळख, ज्ञान, प्रश्नोत्तर या प्रक्रियेतून जावे लागले. प्रश्नोत्तरमध्ये पाच प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्याने डॉ. रिचा हिची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीत देशभरातून २० स्पर्धक निवडले गेले. त्यात वेगवेगळ्या राज्यातील चित्रपट आणि मालिका क्षेत्राशी संबंधित नागरिकांची संख्या मोठी होती.
दिल्लीच्या अंतिम फेरीत डॉ. रिचा ही पहिली तर त्यानंतरचे पुरस्कार बेंगळुरूच्या जेननी राजन आणि मुंबईच्या अपूर्वा हीने पटकावले. या स्पर्धेचे आयोजक मिसेस युनिव्हर्स प्रियंका पॉल, अंजली राजपूत, करणसिंग प्रिंस आणि बबिता वर्मा हे होते. या स्पर्धेचे संचालन बिग बॉस फेम सब्ब्या साची यांनी केले. अंतिम स्पर्धेत प्रामुख्याने प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी, रोहित रेड्डी, करण खंडेलवाल, आकाश चौधरी उपस्थित असल्याचेही डॉ. आशीष झरारिया यांनी सांगितले.
अधिक वाचा : नागपूरकर उदयन पाठक यांना ‘एफएएसएम’ पुरस्कार जाहीर