नागपूर मेट्रो रेल्वेसाठी चीनची सीआरआरसी कंपनी कोच तयार करीत आहे. येत्या डिसेंबरपर्यंत दोन ट्रेन नागपुरात दाखल होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
नागपूर मेट्रोसाठी सीआरआरसी कंपनीला ६९ कोच निर्मितीचे काम दिले आहे. तीन कोचेचची एक मेट्रो नागपुरातील मेट्रो मार्गावरून धावणार आहे. एकूण २३ ट्रेन तयार करण्याचे काम सुरू आहे. यापैकी दोन ट्रेन डिसेंबरपर्यंत नागपुरात दाखल होणार आहे. दोन मेट्रो ट्रेनपैकी एकाची निर्मिती झाली असून त्यात आवश्यक उपकरणे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीआरआरसी तयार करत असलेले कोचेसमध्ये आधुनिक सोयी सुविधा असणार आहे. विशेषतः लहान मुलांसह महिला आणि वृद्धांसाठी आवश्यक त्या सर्व बाबींकडे अगदी बारकाईने लक्ष देण्यात आले असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
जपानहून सुटे भाग
कोचेसच्या निर्मितीसाठी विविध प्रकारचे सुमारे तीन हजार सुटे भागांची आवश्यकता असते. कोचेस मध्ये लागणारे उपकरण, बैठक सीट व इतर बाबींकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. संगणकाच्या साह्याने स्टेनलेस स्टीलचे शीट्स आवश्यक त्या आकारानुसार कापल्या जातात व रोबोटच्या मदतीने वेल्डिंगचे केले जाते. कोच तयार करण्यासाठी अंडरफ्रेम, साइड वॉल, एंड वॉल, रूफ आणि कॅब स्ट्रक्चर इत्यादी सर्व भाग जोडले जातात. कोचेस मध्ये लागणारे इन्व्हर्टर आणि इतर काही उपकरणे जपानमध्ये तयार केले असून हे उपकरणे सीआरआरसी कारखान्यात पाठविण्याची प्रक्रिया झाली आहे.
परीक्षणानंतर नागपुरात येणार
कोचेस तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच डालियन येथे विविध (स्थिर आणि गतिशील) चाचण्या करण्यात येईल. यात वेयिंग टेस्ट (प्रत्येक रिकाम्या कोचेसचे वजन), वाहन स्टॅटिक गेज टेस्ट (फिरत्या कोचेसच्या विविध मानकांचे परीक्षण), वॉटर लीकेज टेस्ट (पाणी कोचेस मध्ये येणार नाही यासाठी करण्यात येणारे परीक्षण), सिग्नल सिस्टीम इन्स्टॉलेशन टेस्ट ( तयार झालेल्या कोचेस मधील विविध प्रणालींची योग्य तपासणी) इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे. या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर ६ कोचेस (दोन मेट्रो ट्रेन) सीआरआरसी येथून नागपूरला आणल्या जातील. मिहान कार डेपो येथे कोचेस उतरविले जातील.
अधिक वाचा : अब दोडेगी मेट्रो 90km की स्पीड से