नागपुर : उपराजधानीतील जरीपटका पोलिसांनी मोठी कार्रवाई करत गुप्त सुचनेच्या आधारे एक दोन नव्हे तर ९ टन गोमांस जप्त केले आहे, शिवाय १ ट्रक जप्त करुण या प्रकरणात पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे. कार्रवाई नंतर पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी सुरु केली आहे.
२०१५ मध्ये राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. हा कायदा लागू झाल्यानंतर गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकार दरबारी गोवंश हत्येला बंदी असली, तरी गोहत्या आणि गोमांस विक्री सर्रासपणे सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोमांसने भरलेला ट्रक कामठीमार्गे नागपुरच्या दिशेने येणार असल्याची गुप्त माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली होती. ही माहिती समजताच पोलिसांनी कामठी मार्गावरील उपलवाडी येथे सापळा रचून नाकेबंदी करून ट्रक थांबवला. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली. तेव्हा या ट्रकमध्ये मोठ- मोठ्या फ्रिजरमध्ये गोमांस ठेवलेले आढळून आले.
जरीपटका पोलिसांनी ट्रकसह गोमांस जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या गोमासचे वजन ९ टन इतके आहे. पोलिसांनच्या माहिती नुसार जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २४ लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणात १० लोकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली असून, गोमांस तस्करी करणारी अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता दिसून येत आहे.
अधिक वाचा : नागपुर रेलवे स्टेशन पर “स्पेशल क्राईम डिटेक्शन टीम’’ के द्वारा शराब की कुल 189 बोतल जप्त की गई