नवी दिल्ली : एका औषधामध्ये एकापेक्षा अधिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या ३४३ औषधांवर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या औषधांना ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ म्हटले जाते. ही औषधे आरोग्यास हानीकारक असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने या प्रकारच्या ३४३ औषधांवर बंदी आणली आहे. हा निर्णय़ औषधनिर्माण क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांसाठी दणका देणारा आहे. त्यामुळे सॅरेडॉन सारख्या तात्काळ गुणकारी ठरणाऱ्या गोळ्या मिळणार नाहीत.
गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांचा प्रतिरोध सातत्याने वाढता आहे. वाढते प्रदूषण, व्याधींचे बदलते प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरतो आहे. प्रतिजैविकांचा वाढता वापर वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात सोसावे लागतील याकडेही वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने लक्ष वेधत होते. काही वेळा औषधांमध्ये एकापेक्षा अधिक घटकांची आवश्यकता नसते. तरीही आजारावर त्वरित उतारा मिळावा यासाठी ही औषधे दिली जातात. या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या औषधांचे प्रमाण बाजारामध्ये सातत्याने वाढते आहे. त्यामुळे या औषधांचे सेवन हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याच्या असंख्य तक्रारी केंद्र सरकारच्या औषधनियंत्रक विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत औषध नियंत्रक विभागाने ही कारवाई केली आहे. औषधनियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन असलेल्या औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानुसार दीड वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात घातलेली ही बंदी उठवण्यात आली.
सेरेडॉन बंद पण डीकोल्ड टोटल नाही
सरकारनं सेरेडॉन बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी डीकोल्ड टोटल, फेंसेडाइल आणि ग्रायलिंकट्स यांच्यावर बंदी असणार नाही. फक्त टेक्निकल बोर्डाच्या शिफारसींवरून औषधांवर बंदी घालू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. ही औषधं १९८८ च्या आधी निर्मित आहेत, म्हणून त्यांच्यावर बंदी घाला, असं न्यायालयानं सांगितलं होतं. या औषधांचं कोणतंही थेरेप्टिक जस्टिफिकेशन नाही. ही औषधं रुग्णांसाठी घातक आहेत, असं बोर्डानं सांगितलं आहे.
सर्दी, खोकला आणि डिप्रेशनच्या औषधांवर कोणतीही बंदी घालण्यात आली नाही. मायक्रोलॅब ट्रायप्राईड, एबॉट ट्रायबेट आणि ल्यूपिन ग्लूकोनॉर्म या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. मागच्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं ३२८ फिक्स डोज मिश्रण (एफडीसी) असलेल्या औषधांचं परीक्षण करायला सांगितलं होतं.
अधिक वाचा : इंधनचे दर कमी करणं आमच्या हातात नाही : मोदी सरकार ने हात झटकले