नागपूर :- नागपुर आणि विदर्भाचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरांची जपणूक करीत गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानीत दरवर्षी मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तान्हा पोळ्याच्या दिवशी शहरात काळी-पिवळी मारबत आणि विविध लक्षवेधी बडग्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक येत्या सोमवारी मस्कासाथ, शहीद चौक, टांगा स्टँड, इतवारी, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल शिवाजी पुतळा या भागात काढली जाना आहे.
या दिवशी मारबत मिरवणूक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी एकत्र होत असते. दर वर्षी नेहमी प्रमाणे सकाळी तऱ्हाने तेली समाजातर्फे पिवळ्या मारबतीची व नेहरू पुतळा येथील श्री देवस्थान पंचकमेटीतर्फे काळ्या मारबतीची पूजा करण्यात येते. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येते. काळी व पिवळी मारबत नेहरू चौकात एकत्र येऊन दोघींचीही गळाभेट होते. यासाठी मिरवणूक मार्गावर सकाळी पासून पोलीस बंदोबस्त लावण्यात येते.
ऐतिहासिक काळ्या मारबतीला १३८ वर्षांचा तर पिवळ्या मारबतीला १३४ वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात आणि शहीद चौकात एकत्र येतात. या वेळी त्या ठिकाणी एकच जल्लोष करण्यात येतो. इंग्रज राजवटीच्या विरोधात १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत ही मारबत काढली जात आहे. पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे.
श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १३४ वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. स्वातंत्र्यकाळात इंग्रजांची सत्ता होती. जुलमी इंग्रजांच्या कारवायामुळे जनता त्रस्त होती. त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली, त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात येत आहे.
अधिक वाचा : Centre Point School wins the TCS IT Wiz 2018 Nagpur edition