Asian Games 2018: टेनिसमध्ये अंकिता रैनाने जिंकले कांस्य पदक

Date:

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज रंगलेल्या टेनिसच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या अंकिता रैनाचा पराभव सामना करावा लागला. त्यामुळं तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या शुआई जेंगनं अंकिताचा ४-६, ६-७ अशा फरकानं पराभव केला.

आज झालेल्या सामन्यात २५ वर्षीय अंकितानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या सेटमध्ये तिनं प्रतिस्पर्धी शुआईवर अनेकदा आघाडी घेतली. मात्र, ऐन वेळी दुखापत झाल्यानं तिला ब्रेक घ्यावा लागला. प्राथमिक तपासणीनंतर ती पुन्हा कोर्टवर उतरली. मात्र, सुरुवातीची तिला लय कायम राखता आली नाही. पहिला सेट तिनं ४-६ असा गमावला. दुसऱ्या सेटमध्ये तिनं कडवी लढत दिली. मात्र, तिला यश आलं नाही. हा सेटही तिला ६-७ अशा निसटत्या फरकानं गमवावा लागला. सुवर्णपदक जिंकण्याच्या ईर्षेनं खेळ करणाऱ्या अंकिताला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

२०१८च्या एशियाडमध्ये टेनिसमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलंच पदक आहे. अंकिताच्या या पदकामुळं भारताच्या खात्यातील पदकांची एकूण संख्या १६ झाली आहे. त्यात चार सुवर्ण, ३ रौप्य व ९ कांस्य पदकांचा समावेश आहे.

हेही वाचा : PV Sindhu : World’s 7th highest paid female athlete

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related