ब्ल्यू व्हेलनंतर जीवघेणा ठरलेल्या ‘मोमो’ गेममुळे भारतात पहिला बळी गेला आहे. या गेममुळे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमजमेर येथे घडली आहे. या मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी मोमोमुळेच तिने आत्महत्या केलीय का? याचा तपास करण्याची मागणी केली आहे.
या मुलीच्या एका मैत्रिणीने तिच्या भावाला दिलेल्या माहितीवरून तिने मोमोमुळेच आत्महत्या केली असावी असं सांगितलं जातंय. मोमोच्या शेवटच्या राऊंडला पोहोचल्याने त्याची बहिण खूपच आनंदात असल्याचं या मुलीनं मृत मुलीच्या भावाला सांगितलं होतं. तर ‘रिकाम्या वेळेत ती घरी आणि शाळेतही मोमो गेम खेळायची’, असं तिच्या भावानं स्पष्ट केलंय. पोलीस तपासातही तिने गळफास लावून घेण्यापूर्वी मनगट कापल्याचं समोर आलंय.
दरम्यान, कमी मार्क्स मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचं या मुलीनं सुसाईड नोटमध्ये म्हटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या मुलीच्या इंटरनेट ब्राऊजिंगची हिस्ट्रीही तपासली जात आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. अमेरिका, अर्जेंटिना, फ्रान्स, मेक्सिको आणि जर्मनी आदी देशांमध्ये मोमो या जीवघेण्या खेळाने धुमाकूळ घातला आहे. मोमोमुळे अर्जेंटिनामध्ये जगातला सर्वात पहिला बळी गेला होता.
हेही वाचा : पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तक मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो