नागपूर : मुलाला दुर्धर आजार, थकलेले वय, दोन नाती लग्नाच्या, दुष्काळ, कुटुंबाचा सांभाळ करणे कठीण झाल्याने हतबल ८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतात स्वतः सरण रचून जाळून घेऊन जीवनयात्रा संपविली. ही ह्रदयद्रावक घटना मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मदना येथे घडली. गोपाळराव जाणे (वय ८५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गोपाळराव यांच्याकडे थोडी शेती आहे. मुलाला तीन मुली असून एकीचे लग्न झाले. दोघींचे व्हायचे आहे. मुलाला दुर्धर आजार असल्याने तो अंथरुणाला खिळला आहे. गोपाळराव याही वयात काबाडकष्ट करून संसाराचा गाडा चालवायचे; पण अलीकडे त्यांना आजाराने घेरले. त्यात दुष्काळ व आर्थिक परिस्थिती बेताचीच. यामुळे ते हतबल झाल्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला व २ मार्च रोजी त्यांनी स्वतःच शेतात सरण रचले व पेटवून घेत आत्महत्या केली.
अधिक वाचा : अपहरण करून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार