नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या कामठी पोलिसांनी नाकेबंदी दरम्यान, एका चारचाकी गाडीतून ४६ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक मोहम्मद सादिक हाबिबुर रहेमान याच्यासह दोघांना अटक केली आहे.
कामठी पोलिसांना शहर पोलीस हद्दीत गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी कामठी परिसरातील भुयारी पुलाजवळ नाकेबंदी केली. या नाकेबंदी दरम्यान एका चारचाकी गाडीत ४६ किलो गांजा आढळून आला. तो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी याशिवाय अंदाजे ४ लाख रुपयांच्या किमतीची चारचाकी गाडी देखील जप्त केल्याने जप्तीच्या मुद्देमालाची किंमत ८ लाख ७५ हजार रुपये इतकी झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाहनचालक मोहम्मद सादिक हाबिबुर रहेमान याच्यासह मुजाहिद कमाल अन्सारी आणि मोहम्मद अल्ताफ याला अटक केली आहे. मात्र, आणखी एका आरोपीची अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक वाचा : चार्जिंगवर लावलेले मोबाईल चोरले, एकाला अटक