मुंबई- आशुताेष गोवारीकर यांचा ‘पानिपत‘ अर्जुन कपूरच्या करिअरचा पहिला ऐतिहासिक चित्रपट ठरला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या चित्रपटात अर्जुन संजय दत्तशी झुंज देताना दिसणार आहे. दोघांनीही त्यासाठी परिश्रम घेतले आहेत. खास करून चित्रपटाच्या अॅक्शन सीन्स दरम्यान दोघांनीही सुमारे 25 किलो चिलखत घालून शॉट्स दिले. दोघांनाही हे भारी पोशाख घालण्यात आणि शॉट्स देण्यात मोठी अडचण झाली होती. यावेळी घोड्यांनाही खूप त्रास झाला कारण चिलखत घातल्यामुळे कलाकारांचे वजन वाढले होते, त्यामुळे त्यांना कलाकारांचे वजनदेखील पेलावे लागले. या चित्रपटात अर्जुनने जो पोशाखा घातला आहे त्याला ‘चिल्ता हजार माशा’ म्हणतात. यात छोटे-छोटे खिळे लागलेले असतात.
कशा प्रकारे ‘पानिपत’ ची तयारी करण्यात आली…, पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये मला काही रस नव्हता. दुसरी लढाई मी जोधा अकबरमध्ये दाखवली होती. तिसऱ्या लढाईविषयी मी बालपणी बरेच काही ऐकले, वाचले होते. कारण ही लढाई आपण अहमद शाह अब्दालीकडून हरलो होतो. सुरुवातीलाही मला यात रस नव्हता. मात्र दिग्दर्शक बनल्यानंतर यात माझी आवड वाढत गेली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर चित्रपट बनू शकतो, असा विचार मी नेहमी करायचो. बराच विचार आणि अभ्यास केल्यानंतर यातून बऱ्याच धाडसी कथा समोर आल्या. ही लढाई हरियाणा राज्यातील पानिपतच्या जवळ झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. मराठ्यांनी १ लाखाहून मोठी फौज उभारली होती व पानिपतकडे आगेकूच केले होते. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहीम चालू झाली.
अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येऊन मिळाल्या त्याने सैन्याला बळकटी मिळाली. हे सर्व तथ्य मिळाल्यानंतर आमचे निर्माते रोहित शेलाटकरदेखील खूप खुश झाले. त्यांच्या मनाताही हा विचार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. अशा प्रकारे ‘मोहनजो दारो’ चित्रपटानंतर ‘पानिपत’चित्रपटाचा पाया रचला.
अशा प्रकारचे पोशाख घालून लढाईचे दृश्य शूट करायचे संजय दत्त आणि अर्जून कपूर…
- 25 किलोचे चिलखत घालायचे दोन्ही कलाकार.
- प्रत्येक शॉट कट झाल्यानंतर ते आपापले चिलखत काढून ठेवत होते कारण, ते घालून ते जास्त वेळ बसू शकत नव्हते किंवा उभेही राहू शकत नव्हते.
- पूर्ण यूनिटच्या लोकांनी चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे.
याचादेखील केला सराव…
- सर्वच मुख्य कलाकारांनी सहा महिन्यापर्यंत तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकली.
- सर्वांनी यासाठी टक्कल करून घेतले हाेते.
- अर्जुन आणि कृती सेनन यांना मराठी शिकवण्यासाठी लोक ठेवण्यात आले.
- चित्रपटाचा निर्माता डिझायनर नितिन देसाई यांनी 18 व्या शतकातील शस्त्र बनवून घेतले. यात समशेर, खंडा आणि गुप्तीचा वापर करण्यात आला.