प्रेमप्रकरणातून १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Date:

नागपूर : हातावर ब्लेडने वार केल्यानंतर विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वांजरा ले-आऊट येथे रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सिमरण राजू वरठी (वय १४),असे मृतकाचे नाव आहे.

प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे. सिमरण नववीत शिकत होती. शनिवारी सकाळी तिने ब्लेडने हातावर चिरा मारल्या. आईने तिची समजूत घातली. मध्यरात्री तिने तिच्या खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. पहाटे ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक यू. ए. राठोड यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. तिचे वडील चालक असून, आई गृहिणी आहे. तिला दोन भाऊ आहेत.

अधिक वाचा : स्वतःचं जिम सुरु करण्यासाठी घरफोडी, दोन बॉडीबिल्डर्स अटकेत

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related