नागपूर : आईवडिलांच्या मृत्यूनंतर मामीसोबत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दिलीप राठोड (वय 21, रा. जय गुरुदेवनगर, अजनी) आणि पूजा फ्रान्सीस (वय 25) अशी आरोपींची नावे आहेत.
सध्या पीडित मुलगी आजी-आजोबांकडे राहते. काही दिवसांपासून आरोपीचे तिच्या घरी येणे-जाणे वाढले. त्याची वाईट नजर पीडितेवर होती. ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिच्या नातवाईक महिलेच्या मदतीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले व १९ फेब्रूवारी २०१९ ला तिच्यावर अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार अत्याचार करू लागला. दोन दिवसांपूर्वी पीडितेची मावशी तिला भेटायला घरी आली. मावशीने तिची आस्थेने चौकशी केली. तिने आपल्या मावशीला सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
अधिक वाचा : मनीषनगर में सेक्स रैकेट पर छापा, महिला गिरफ्तार