नागपूर : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे यासाठी अॅग्रोव्हिजन कार्यशाळा, कृषी प्रदर्शन व परिसंवाद चे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम येत्या २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये बांबू शेती आणि त्याच्या उत्पादनावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय चंदन लागवडीचे विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ७० टक्के बांबू आणि ३० टक्के कापूसाचा वापर करुन बांबूचे शर्ट तयार करू शकतो. शिवाय बांबूपासून बायो फ्युएल निर्मिती करता येवू शकते. यासाठी बांबू उत्पादनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यंदाच्या अॅग्रोव्हिजन सोहळ्याचे कृषी ज्ञान, तंत्रज्ञान, कार्यशाळा, अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरण, कृषीविषयक ताज्या विषयावरील चर्चासत्र, पशु प्रदर्शन, अॅग्रीथॉन आणि बळीराज्याच्या गौरवाचा अॅग्रोव्हिजन अवार्ड सोहळा आदी या प्रदर्शनाचे खास वैशिष्टये राहणार आहेत.
ऍग्रोव्हिजन ला १० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने शहरात नवे कायम स्वरूपी शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात एक वेळी हजार शेतकरी प्रशिक्षण घेऊ शकतील अशी सोय या कार्यशाळेत असेल. असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपयांची शासनाने मदत केली आहे.
अधिक वाचा : २२ ते २८ डिसेंबरमध्ये ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे नागपूरात आयोजन