नागपुर :- राफेल विमान खरेदी करण्यात भारतीय जनता पार्टी च्या सत्ताधारी सरकारने फार मोठा घोटाळा केला आहे. हे करते वेळी सरकारने कुठल्याही नियमांचे पालन केलेले नाही, असा आरोप माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. ते शनिवारी नागपूरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे चिदंबरम म्हणाले, देशाला तात्काळ या विमानांची गरज असल्याचे सांगून विमान खरेदीची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, हे विमान ७ ते १० वर्षांनी मिळणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष या व्यवहारात कुठलीही गोपनियता नसल्याचे सांगतात. मात्र, सत्ताधारी सरकार व्यवहार गोपनीय ठेवल्याचे सांगतात. नेमका विश्वास ठेवायचा कुणावर? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकूणच सरकार विमानांच्या किंमतीवरून लपवा छपवीचा खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी या दरम्यान केला. पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, नितिन राउत, राजेंद्र मुळक आदि उपस्थित होते.
और पढे : भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्मर सप्लाई करेगी नागपुर की कंपनी