खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार

खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार
खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पूर्व नागपुरात राजकीय रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. शांतीनगर, प्रेमनगर भागात आपल्या आमदार निधीतून लावण्यात आलेल्या बेंचवर पेंट मारून, नाव मिटवून आ. अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आल्याची तक्रार आ. कृष्णा खोपडे यांनी शांतीनगर पोलिसात केली आहे. याप्रकरणी झोनचे कंत्राटदार राजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही खोपडे यांनी केली आहे.

मी चिंधीचोरी करीत नाही : वंजारी

मी अशी चिंधीचोरीची कामे कधी करीत नाही. कुठल्याही अधकारी किंवा कंत्राटदाराला दुसऱ्याच्या बेंचवर पेंट मारून माझे नाव टाकण्यास मी सांगितले नाही व सांगणारही नाही. माझा स्वत:चा आमदार निधी मी जनसेवेसाठी वापरत आलो आहे. गरज भासली तर महाविकास आघाडी सरकारकडून आणखी निधी खेचून आणेन, अशी प्रतिक्रिया आ. अभिजित वंजारी यांनी याप्रकरणी लोकमतशी बोलताना दिली. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केली तर आपल्याला हरकत नाही. फक्त चौकशी निष्पक्ष व कुणीतरी आरोप करतो म्हणून दबावाखाली होऊ नये, अशी भूमिकाही वंजारी यांनी मांडली.